Wednesday 1 February 2017

तृप्ती (लेख)

"ज्याला सगळं भरभरून मिळालय त्याला gratefullness च्या गोष्टी करणं सोपं आहे. माझ्यासारखं वर्षानुवर्ष त्रास काढल्यावर या सगळ्या नुसत्या बोलायच्या गोष्टी वाटतात." सामोरच्या व्यक्तीचं ते बोलणं त्या क्षणाला मला रास्तच वाटलं . पण नंतर बोलण्याच्या ओघात जेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या इतर गोष्टींबद्दल बोललो तेव्हा मला जाणवलं की बाकी बर्याच front वर त्याच व्यक्तीचं उत्तम चालू होतं. मात्र अजाणता का होईना त्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्याच्या कॅनव्हसवरच्या  त्या एका dark spot कडे स्वतःचं सगळं लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळे त्यांना अक्खा कॅनव्हासच काळा वाटत होता.

       एखादं मोठं चित्र नीट पाहायचं असेल तर थोडं मागे जाऊन पूर्ण चित्र एका नजरेत पाहावं लागतं . म्हणजे सगळ्या अंगांनी ते दिसतं, आणि लक्षात येतं की एखादा कोपरा जरी थोडा बिघडला असला तरी ओव्हरऑल चित्र काही अगदी टाकाऊ नाही आहे. आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्याचंही काहीसं असच नसतं का? एखादी गोष्ट, एखादं नातं, कधी पैसा, कधी शिक्षण, कधी करिअर , कधी मुलं, एखाद्या ठिकाणी आपण थोडे कमी असलो तरी बाकी बर्याच front वर आपण बरे असतो की! मग आपण सदैव कुरकुर कसली करत असतो?

      काही लोक बघावं तेव्हा हसत असतात, खुश असतात. ज्यांना हे जमत नाही ते बर्याच वेळा अशा दिलखुष लोकांना shallow (उथळ) समजतात. उलट काही लोक सदानकदा त्रस्त असतात. त्यांच्याकडे त्रासलेलं असायला काही कारणंही असतात. पण हीच कारणं सो कॉल्ड shallow किंवा दिलखुष लोकांकडे नसतात असं नाही. माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत. पन्नाशीच्या आहेत. नवरा लवकर गेला. त्यांना अठरा वर्षांचा ऑटिस्टिक मुलगा आहे. त्याचे दात घासण्यापासून , ते आंघोळीपर्यंत सगळं काही या बाईंनाच करावं लागतं आणि आयुष्यभर करावंच लागणार. शिवाय पोटापाण्यासाठी नोकरी. परदेशात काही विशेष मदतीशिवाय या बाई समर्थपणे हे करतायत. आणि त्या मला सांगत होत्या ,"ही एवढी गोष्ट आहे पण बाकी काही (!!) त्रास नाही. 'त्या'ने मला सगळं दिलय. अडचणी येतातच, नाही असं नाही but finally everything falls into place.... !!! आणि 'तो' आहे ना, 'त्या'ने आतापर्यंत सगळी काळजी घेतलीच ना , पुढेही 'तो' घेणारच! त्यामुळे मला भीती वाटत नाही उलट तृप्त वाटतं." मी अवाक !! विश्वासातून आलेली कृतज्ञता की कृतज्ञतेतून आलेला विश्वास! काय माहीत पण या दोन्हीच्या बळावर या बाई आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडून इतक्या कठीण परिस्थितीतही 'तृप्त'ता आनुभवतायत....

      मग आमचंच घोडं कुठे पेंड खातं ? आम्हाला हा peace , ही तृप्ती का अनुभवता येत नाही? माझ्या एका अतिशय प्रिय व्यक्तीने मला सांगितलंय की 'अधून मधून आयुष्याकडे मागे वळून पहा. तुझ्या आयुष्यातले सारे चांगले आणि वाईट  प्रसंग आठव. मग तुला जाणवेल की खरंतर आपल्या आयुष्यात खूपशा चांगल्या गोष्टी घडल्यायत. आणि ज्या थोड्या वाईट गोष्टी घडल्या त्यातूनही तू तरली आहेस आणि आज उभी आहेस. मग आतापर्यंत उभी आहेस तशी पुढेही तऱशीलच. मार्ग काढशीलच. हा विचार तुला झुंजायला बळ देईल. तसच त्यामुळे तुझी आयुष्याबद्दलची कृतज्ञता वाढेल' . मी अधून मधून अशी वळून बघते and it works खरंच कृतज्ञतेने माझं मन भरून येतं . थोड्या वेळापुरतं का होईना मला 'तृप्त', content वाटतं. तृप्तीचा हा सुखद अनुभव जो अधून मधून येतो तोच आपली constant state of mind झाला तर  ... किती सुंदर होईल ना आयुष्य ?

डाॅ. माधुरी ठाकुर


1 comment:

  1. छान त्रुप्त केव्हा व्हायच हे आपण ठरवाच

    ReplyDelete